संगमनेर दुधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण; मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल

संगमनेर दुधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण; मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल

दुधगंगा पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी तुरुंगात असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे याला अचानकपणे संगमनेरातील दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालय संगमनेर आणि या रुग्णालयातून थेट नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोपीला नगर येथे का दाखल करण्यात आले, याबाबत वैद्यकीय अधिकाऱयांसह संगमनेरचे दुय्यम कारागृह अधीक्षक तथा तहसीलदार यांनी मौन बाळगले. तर, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संपर्क करूनही प्रतिसाद दिला नसल्याने आरोपीच्या आजाराबाबत संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ठेवीदार व आर्थिक घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पीडितांमध्ये उलटसुलट चर्चा आणि आरोप केले जात आहेत.

दुधगंगा नागरी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याला अनेक महिन्यांनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. जामीन न मिळाल्याने आरोपी संगमनेरच्या कारागृहामध्ये होता. मात्र, चार दिवसांपूर्वी आरोपी कुटे याला संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आजारपणाचे कारण दाखवून ऍडमिट करण्यात आले आणि त्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱयांच्या अहवालानुसार थेट नगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी 18 तारखेला अहवाल दिल्यानंतर कारागृह अधीक्षक तथा तहसीलदारांनीदेखील लगेच याचदिवशी आदेश काढून झटपट कार्यवाही केली आहे.

संगमनेरचे तहसीलदार तथा दुय्यम कारागृह अधीक्षक धीरज मांजरे यांच्याशी भ्रमणध्वनी व्हॉट्सऍपद्वारे संपर्क करून आरोपीला नगरला उपचारासाठी दाखल करण्यास जी कारणे देण्यात आली आहेत, त्याचा डॉक्टरांनी दिलेला अहवाल मागितला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी त्यांनी मौन बाळगले आहे. या संदर्भात संगमनेरची प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनादेखील कळविण्यात आले होते.

नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) संजय घोगरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून दोनदा संपर्क केला असता, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. एकंदरीत सर्व बाबी पाहाता याप्रकरणी एवढे मौन बाळगण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी, त्याला नेमका कोणता आजार झाला आहे आणि रुग्णालयात किती दिवस ठेवावे लागणार आहे, याबाबतदेखील वैद्यकीय अधिकाऱयांनी माहिती दिली नाही.

सर्वच शासकीय यंत्रणांवर राजकीय दबाव

– मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा राजकारणातील बडी असामी असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अनेक दिवस फरार होता. आरोपीचे राजकीय संबंध पाहाता आणि अद्यापही विविध पदांवर असणाऱया या आरोपीला छुप्या पद्धतीने राजकीय सपोर्ट मिळत आहे. याप्रकरणी राजकारणातल्या बडय़ा नेत्यांचा, सत्ताधाऱयांचा संगमनेरातील आणि जिह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांवर दबाव असल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;