सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम

सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम

दहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या लाजीरवाण्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी माजी मंत्री रावसाहेब दानवे हे बैठक घेत असतानाच सूर्यकांता पाटील यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिला.

दहा वर्षांपूर्वी सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आल्या होत्या. आपण स्वखुशीने राजीनामा देत आहोत, असे त्यांनी सांगितले. पुढील भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ असे उत्तर दिले. दहा वर्षांत भाजपकडून खूप काही शिकायला मिळाले, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर त्यांनी टीकेची झोड उठवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;