NEET परीक्षा प्रकरण- राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे प्रमुख सुबोध कुमार यांची हकालपट्टी; केंद्राचा मोठा निर्णय

NEET परीक्षा प्रकरण- राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे प्रमुख सुबोध कुमार यांची हकालपट्टी; केंद्राचा मोठा निर्णय

देशभरात NEET परीक्षांचा विषय गाजत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. देशभरात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता केंद्राने मोठा निर्णय घेत राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे प्रमुख NTA DG सुबोध कुमार यांची हकालपट्टी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत NEET-PG पुढे ढकलण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

NEET परीक्षेत हेराफेरी आणि पेपर लीक प्रकरणी कारवाई करत केंद्र सरकारने मोठी कारवाई करत NTA DG सुबोध कुमार यांना पदावरून हटवलं आहे. तसेच प्रदीपसिंग खरोना यांच्याकडे राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करताना म्हटलं आहे की, काही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घोळ झाल्याच्या आरोपांच्या अलीकडील घटना लक्षात घेत, राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित केलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून 23 जून 2024 रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालय मनापासून दिलगीर आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;