ओबीसीतून कोणाला आरक्षण देऊ नये, द्यायच असेल तर स्वतंत्र आरक्षण द्या; खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाजपला सल्ला

ओबीसीतून कोणाला आरक्षण देऊ नये, द्यायच असेल तर स्वतंत्र आरक्षण द्या; खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाजपला सल्ला

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. ओबीसीतून कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. याच मुद्द्यावरुन नवनिर्वाचीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी संघाच्या सत्कार कार्यक्रमात बोलत असताना आपले परखड मत व्यक्त केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहाला संबोधित करताना आपले परखड मत त्यांनी व्यक्त केले. “कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण आरक्षण देताना ओबीसीतून कोणालाही आरक्षण देऊ नका. आरक्षण द्यायच असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी बांधव स्वस्त बसणार नाही. गरज पडली तर मी सुद्धा खांद्याला खांदा लावूण रस्त्यावर उतरेन”, असे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार सुधाकर अडबाले, महासचिव सचिन राजूरकर यांच्यासह ओबीसी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक संघटना आणि इतर सामाजिक संघटना, चंद्रपूरच्या वतीने खासदार धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;