शहरी बस वाहतुकीमध्ये महिला व ज्येष्ठांना 50 टक्क्यात तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
राज्य परिवहन विभागामध्ये रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 100%, 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% व महिलानां 50% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. 22 जूनच्या मध्यरात्रीपासून अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती विभाग प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीकरिता आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना दिलेली ओळखपत्र (मात्र त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे). पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र, डी जी लॉकर, एम आधार व राज्य परिवहन महामंडळाव्दारे देण्यात आलेले स्मार्ट कार्ड ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List