अभिनेत्रीसमोरच चाहत्यावर अत्याचार, तो जीवाची भीक मागत होता पण तिने…

अभिनेत्रीसमोरच चाहत्यावर अत्याचार, तो जीवाची भीक मागत होता पण तिने…

कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याने त्याच्याच चाहत्याचा खून केला आहे. रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली अभिनेता सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणात नवीन अपडेट्स समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे बोलले जात आहे की अभिनेत्री पवित्रा गौडा ही देखील गुन्हा झाला त्या ठिकाणी उपस्थित होती. कारण तिला रेणुकास्वामींवर अत्याचार होताना पाहायचे होते. पवित्रा हिनेच दर्शनला रेणुकास्वामीला धडा शिकवण्यासाठी चिथावणी दिली होती, असे पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात आधीच उघड झाले आहे.

8 जून रोजी रेणुकास्वामीचे त्याच्या मूळ गावी चित्रदुर्गातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला 200 किलोमीटर दूर बंगळुरू येथे नेण्यात आले जेथे त्यांना एका गोडाऊनमध्ये बंद करण्यात आले. यानंतर दर्शन आणि पवित्रासह 17 जणांनी रेणुकास्वामींना एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला.

रेणुकास्वामी यांना विजेचे शॉक देण्यात आले

रेणुकास्वामी यांना आरोपींनी विजेचे शॉक देखील दिले. शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले आहे. त्यांना लाठ्या-काठ्याने मारहाण करून शरीराच्या अनेक भागांवर जखमा दिल्या. इतकंच नाही तर यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. मृतदेह सापडला तेव्हा त्याचा एक कान देखील गायब असल्याचं समोर आलं. रेणुकास्वामी यांच्या प्रायव्हेट पार्टवरही जखमेच्या खुणा होत्या.

दर्शनला अटक झाल्यानंतर त्याची को-स्टार अनुषा राय हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात दर्शनच्या सहभागाबद्दल तिने आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुषा म्हणाली की- त्याला राग खूप लवकर येतो पण तो खूप चांगला माणूस आहे. लोक त्याच्याशी सावधपणे बोलतात कारण त्याला सहज राग येतो. जेव्हा मी त्याच्याशी बोलते तेव्हा मी माझ्या मर्यादेत राहते. स्वत: दर्शनने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या रागाबद्दल सांगितले आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी दिले 40 लाख

हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी दर्शनने त्याच्या मित्राकडून ४० लाख रुपये उसने घेतल्याचे देखील समोर आले होते. खुद्द दर्शननेच पोलिसांना याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने त्याचा मित्र मोहन राज याच्याकडून ४० लाख रुपये उसने घेतले होते, जेणेकरून तो हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी हे पैसे त्याच्या साथीदारांना देऊ शकेल.

दर्शन 11 जूनपासून तुरुंगात

33 वर्षीय रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली दर्शन 11 जूनपासून तुरुंगात आहे. आतापर्यंत पोलीस तपासात या हत्येशी संबंधित माहिती समोर आली आहे की, 33 वर्षीय मृत रेणुकास्वामी हे अभिनेता दर्शनचे चाहते होते. जानेवारी 2024 मध्ये कन्नड अभिनेत्री पवित्रा गौडा हिने दर्शनसह  10 वी एनिवर्सरी साजरी केली. पण ते वादात सापडले कारण दर्शनचे आधीच लग्न झाले होते. या गोष्टीमुळे रेणुकास्वामी खूप संतापले. त्याने पवित्राला मेसेज करत दर्शनपासून दूर राहण्यास सांगितले. सुरुवातीला पवित्राने त्याच्या मेसेजकडे दुर्लक्ष केले, परंतु नंतर रेणुकास्वामीने आक्षेपार्ह संदेश पाठवून तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन आणि पवित्राने यानंतर मग रेणुकास्वामीच्या हत्येचा कट रचला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;