यूट्यूबरने केले दुसरे लग्न, पहिल्या पत्नीने सवतीला मानले बहीण, बिग बॉसच्या घरात बदलेल नाते…
बिग बॉसच्या घरात अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झालाय. अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. पायलला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिकाला एक मुलगा असून सर्वजण एकत्रच राहतात.
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदर पायल मलिक हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मोठे भाष्य केले. पायल मलिक म्हणाली की, माझ्या आणि कृतिकाच्या भांडणामध्येही प्रेम असते. जर तिने एखादे काम मला न विचारता केले की, आमच्यात भांडणे होतात.
बिग बॉसच्या घरात असतानाही माझ्यात आणि कृतिकामध्ये भांडणे होतील. परंतू, आमच्यात जास्त वाद होत नाहीत. कारण आम्ही दोघी एकमेकींना जास्त समजून नक्कीच घेतो. पायल म्हणाली की, माझ्या कुटुंबियांना वाटते की, बिग बॉस मीच जिंकेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List