आषाढी यात्रेत भाविकांना आवश्यक सोईसुविधा मिळणार; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

आषाढी यात्रेत भाविकांना आवश्यक सोईसुविधा मिळणार; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवारी 17 जुलै 2024 रोजी होणार असून या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंदिर समितीची सभा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे झाली. याशिवाय, शासकीय महापूजेवेळी गाभाऱ्यातील उपस्थितांच्या संख्येबाबत जिल्हा प्रशासनाचे अभिप्राय घेणे, गाभाऱ्यातील तसेच विठ्ठल सभामंडप, बाजीराव पडसाळी येथील सर्व कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करणे, मंदिर समितीच्या 2024-2025 च्या 76 कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी, मंदिर समितीच्या जमिनी खंडाने देणेबाबत लिलाव प्रक्रिया राबविणे, निर्माल्यपासून अगरबत्ती व धुप तयार करणे इत्यादी निर्णय सभेत घेण्यात आले. तसेच 15 व्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिराकरीता श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यामुळे भाविकांना व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

या सभेस सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सर्व खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;