दोन पत्नींसह ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये पोहचलेल्या अरमान मलिकची या अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, इथे..

दोन पत्नींसह ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये पोहचलेल्या अरमान मलिकची या अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, इथे..

बिग बॉस ओटीटी 3 ला सुरूवात झालीये. 21 जून 2024 रोजी रात्री नऊ वाजता प्रीमियर झालाय. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये 16 स्पर्धेक पोहचले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे म्हणजे अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन पोहचलाय. होय तुम्ही खरे ऐकले आहे. अरमान मलिक हा दोन पत्नींसह बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. हेच नाही तर यावेळी अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल ही अरमानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगताना दिसलीये. अरमान मलिक हा तब्बल 200 कोटी संपत्तीचा मालक आहे.

अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच अरमानने कृतिकासोबत लग्न केले. आता अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक हे बिग बॉसच्या घरात काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिका हिला एक मुलगा आहे.

आता अरमान मलिक याची खिल्ली उडवताना अभिनेता करण कुंद्रा हा दिसलाय. करण कुंद्रा याने एक व्हिडीओ तयार केलाय. या व्हिडीओमध्ये करण कुंद्रा हा अरमान मलिकबद्दल बोलताना दिसतोय. करण कुंद्रा याने म्हटले की, बिग बॉस ओटीटी 3 चे प्रीमियर सुरू आहे आणि अरमान मलिक हा तिगडी घेऊन बिग बॉसमध्ये सहभागी झालाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Telly Reporter (@tellyreporter)

अरमान दोन पत्नींना घेऊन आलाय. धन्य आहे तो..लोकांना इथे एकच सांभाळत नाहीये आणि तुम्ही दोन दोन घेऊन आलात तेही थेट बिग बॉसमध्ये…भांडणे प्रो मॅक्स होणार आहेत. थोडे दिवसच थांबा तुम्ही…आता करण कुंद्रा याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करत आहेत.

अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका यासोबतच त्यांचे चार लेकरं एकाच छताखाली राहतात. व्लॉगच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याची सर्व माहिती मलिक कुटुंबिय चाहत्यांना देताना दिसतात. विशेष म्हणजे कृतिका आणि पायल दोघीही बहिणींसारखे राहतात. अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;