मुलाच्या वाढदिवशी नवऱ्याने आणली दुसरी पत्नी, भावूक होत पायल म्हणाली, ‘आई – वडिलांना सोडून…’

मुलाच्या वाढदिवशी नवऱ्याने आणली दुसरी पत्नी, भावूक होत पायल म्हणाली, ‘आई – वडिलांना सोडून…’

यूट्यूबर अरमान मलिक याने पहिली पत्नी पायल मलिक आणि दुसरी पत्नी कृतिका मलिक यांच्यासोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये एन्ट्री केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोचे होस्ट आणि अभिनेते अनिल कपूर यांनी अरमान याला दोन लग्नाबद्दल प्रश्न विचारले तेव्हा पायल हिने भावूक होत सर्व सत्य सांगितलं. अरमान याने मुलाच्या वाढदिवशी कृतिका हिच्यासोबत लग्न केल्याची माहिती पायल हिला दिली.

पायल म्हणाली, ‘मी आणि कृतिका चांगल्या मैत्रिणी होतो. माझ्या मुलाच्या वाढदिवशी कृतिका आणि अरमान यांची ओळख झाली. सेलिब्रेशन संपल्यानंतर कृतिका हिने माझ्याकडून फोटो मागितले. तेव्हा मी तिला सांगितलं, तुझ्या जिजू (अरमान) कडून घे…’

‘तेव्हा अरमान – कृतिका यांना एकमेकांचे मोबाईल नंबर मिळाले आणि दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. त्यानंतर कृतिका सात दिवस माझ्या घरी राहायला आली. त्या सात दिवसांमध्ये अरमान – कृतिका यांच्यामधील जवळीक वाढली आणि अरमान याने दुसरं लग्न केलं. ‘

पुढे पायल म्हणाली, ‘प्रत्येक जण हसत होते. पण माझ्यासाठी ती वेळ फार कठीण होती. कारण मी माझ्या आई – वडिलांना सोडून आली होती. पण जेव्हा माझ्या समोर अरमान – कृतिका यांच्या लग्नाचे फोटो आणि सर्टिफिकेट आले, तेव्हा मला फार मोठा धक्का बसला.’

‘मी आणि अरमान फक्त पती – पत्नी नव्हतो. आम्ही मित्र म्हणून देखील एकमेकांसोबत राहातो होतो. कारण अरमान याचं कोणीच नाही आणि मी माझे आई – वडील सोडून आली होती. अरमान याने दुसरं लग्न करण्याआधी माझी परवानगी घेतली होती. पण मला वाटलं तो मस्करी करत असेल…’

‘जेव्हा माझ्याकडे दोघांच्या लग्नाचे फोटो आले… तेव्हा मला वाटलं हे काय झालं. आता मी काहीच करु शकत नाही. जर आधी आमचं बोलणं झालं असतं, तर काहीतरी केलं असते…’ असं म्हणत असताना पायल हिच्या डोळ्यात पाणी आलं.

पुढे पायल म्हणाली, ‘आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत. अरमान याने लग्नानंतर सर्वकाही माझ्या आणि कृतिकाच्या नावावर केलं आहे.’ सांगायचं झालं तर, अरमान चार मुलांचा बाप आहे. तीन मुलं पायल हिची आहेत तर, एक मुलगा कृतिका हिचा आहे.

अरमान म्हणाला, ‘आम्ही बिग बॉसमध्ये आलो आहोत कारण, आम्हाला सांगायचं आहे की, आमच्या कुटुंबात कोणते वाद नाहीत. आम्ही आनंदाने आयुष्य जगत आहोत…’ सोशल मीडियावर अरमान याचे कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;