हज यात्रेतील मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी

हज यात्रेतील मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी

यावर्षी हज यात्रेत मृत्युमुखी पडलेल्या एक हजारांहून अधिक मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे. हे मृत्यू  नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

सध्या सौदीमध्ये प्रचंड उष्मा आहे. अक्षरशः भाजून काढणाऱया उन्हाचा अनुभव तेथील लोक घेत आहेत. या आठवडय़ात सौदीचे तापमान 51.8 डिग्री सेल्सिअस होते. उष्माघातामुळे  1081 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.

परराष्ट्र  मंत्रालयाने सांगितले की, दरवर्षी अनेक हिंदुस्थानी हज यात्रेला जातात. यावर्षी आतापर्यंत  एक लाख 75 हजार हिंदुस्थानी यात्रेकरू हजला गेले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज एक निवेदन जारी केले. त्यामध्ये आरोग्य सेवांचा आराखडा आणि हज यात्रेकरूंनी या सेवेचा लाभ घेण्याच्या पद्धतींची माहिती दिली आहे. यात्रकरूंचे आरोग्य आणि फिटनेस प्रमाणपत्र, आरोग्य कार्ड, लसीकरण शिबीर आदींसाठी आरोग्य डेस्क उभारणे अशा उपाययोजना आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;