सानिया मिर्झाच्या लग्नावर वडिलांनी अखेर मौन सोडले
हिंदुस्थानची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. यावर सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी खुलासा केला असून या केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक विभक्त झाले होते. दुसरीकडे मोहम्मद शमीदेखील पत्नी हसीन जहा हिच्यासोबत राहात नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांची नावे एकमेकांशी जोडली जात आहे. मात्र यात काहीही तथ्य नसून या केवळ अफवा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List