तनुश्री दत्ताकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप, नाना पाटेकर म्हणाले, ‘जुन्या घटना आहेत, आणि…’

तनुश्री दत्ताकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप, नाना पाटेकर म्हणाले, ‘जुन्या घटना आहेत, आणि…’

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने 2018 मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता… असं वक्तव्य तनुश्री हिने केलं होतं. एवढंट नाहीतर, सिंगर एक्टर शूट होणार होतं, तरी देखील नाना पाटेकर सेटवर आले होते.. असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. याप्रकरणी नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र सबळ पुरावे आणि साक्षीदार नसल्याने पोलिसांनी वर्षभरातच केस बंद केली.

तनुश्री दत्ता प्रकरणावर नाना पाटेकर यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पाटेकर यांना माहिती होतं प्रकरणात काहीही तथ्य नाही. त्यांमुळे त्यांनी कधी राग आला नाही. तुनाश्री दत्ताने केलेल्या आरोपांबाबत नाना पाटेकर म्हणाले…

‘मला माहिती होतं सर्वकाही खोटं आहे. त्यामुळे मला कधी राग आला नाही. जेव्हा सर्वकाही खोटं आहे तर, राग कोणत्या गोष्टीसाठी करू आणि सर्व गोष्टी जुन्या झाल्या आहेत. घटलेल्या घटना आहे. त्यावर आता मी काय बोलणार? जर असं काही झालंच नाही तर, यावर मी काय बोलणार…’

‘अचानक कोणी येत आणि म्हणतं तुम्ही असं केलं आहे.. तसं केलं आहे… या सर्व गोष्टींवर मी काय उत्तर देऊ. मला काय म्हणायला हवं, मी कधी असं काही केलंच नाही? मला असं करायला नको हवं होतं…? मी काहीही केलं नाही, हे सत्य मला माहिती आहे…’ असं नाना पाटेकर म्हणाले.

यावेळी नाना पाटेकर यांनी सोशल मीडियावर देखील मोठं वक्तव्य केलं. ‘सोशल मीडियावर माझ्याबद्दल लोकं चांगलं, वाईट जे काही लिहितात… मी कधी पाहात नाही आणि कधी वाचत देखील नाही. कोणाला शांत करायचं असेल तर कसं करु. कोणी चुकीचं करत असेल तर, त्यांना कोर्टात घेऊन जाईल… पण या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही …’

‘आपल्याला माहिती आहे आपण काहीही चुकीचं केलं नाही. आपली बाजू खंबीर आहे… हिच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;