राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका; 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला

राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका; 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. कोरोना काळात वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 20 पदाधिकाऩयांविरुद्ध खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीला नार्वेकरांनी दांडी मारली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

भाजपने 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनदरम्यान बेस्टच्या वीज दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी बेस्ट महाव्यवस्थापकांना कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपच्या एकूण 20 पदाधिकार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुरु आहे. सध्या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली जात आहे. खटला अंतिम टप्प्यात आलेला असताना शुक्रवारी सुनावणीला राहुल नार्वेकर गैरहजर राहिले. त्यावर संतप्त होत न्यायाधीशांनी नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि दंडाची रक्कम न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश दिले. तसेच 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचेही सक्त निर्देश दिले.

कोर्टाचे निरीक्षण
आमदार-खासदारांविरोधातील खटले जलदगतीने चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केलेली आहे. किंबहुना, उच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे सर्व आरोपींनी प्रत्येक सुनावणीला हजर राहणे आवश्यक आहे. असे असताना आरोपींनी गैरहजर राहून खटल्याला दिरंगाई करणे योग्य नाही, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;