सोनाक्षी सिन्हाचं 23 जून रोजी रजिस्टर मॅरेज, त्याच संध्याकाळी होणार वलिमा

सोनाक्षी सिन्हाचं 23 जून रोजी रजिस्टर मॅरेज, त्याच संध्याकाळी होणार वलिमा

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी 23 जून रोजी तिचा प्रियकर आणि अभिनेता झहीर इक्बालसोबत विवाह बंधणात अडकणार आहे. हे लग्न मोठ्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा होती. पण तसं काही होणार नाहीये. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या विवाहात अनेक मोठे लोकं उपस्थित असतात. पण सोनाक्षीचा विवाह हा झहीर इक्बालच्या घरीच होणार आहे. आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतपणे काहीही दुजोरा दिलेला नाही. मात्र तयारी जोरात सुरू आहे. सोनाक्षीचे मामा पहलाज निहलानीपासून जवळचे कौटुंबिक मित्र आणि अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी लग्नाला दुजोरा दिला आहे. पूनम ढिल्लननेही सांगितले होते की, सोनाक्षीने तिला तिच्या लग्नाची पत्रिका पाठवली आहे.

सोनाक्षी सिन्हा तिच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करत आहे. त्यामुळे प्रत्येकजण या विवाहात सहभागी होणार आहे. लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हा यांचा भाऊही अमेरिकेतून येणार आहे. रजिस्टर मॅरेज झहीर इक्बालच्या घरी होणार आहे.

शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन होणार आहे

23 जून रोजी सकाळी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल रजिस्टर विवाह केल्यानंतर त्याच संध्याकाळी एक भव्य रिसेप्शन (वलीमा) आयोजित केले जाईल, ज्यामध्ये कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त अनेक चित्रपट कलाकार उपस्थित असतील. शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या मुंबईतील बास्टन रेस्टॉरंटमध्ये वलीमा होणार आहे.

37 वर्षीय सोनाक्षी आणि 35 वर्षीय झहीर 23 जून रोजी कायमचे एकत्र होणार आहेत. अनेकांना प्रश्न पडला होता की लग्न कोणाच्या पद्धतीने होणार. पण आता दोघांचं नोंदणीकृत विवाह होणार असल्याचं समोर आलं आहे. सोनाक्षी आणि झहीर शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी होस्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सलमान खानसह अनेक नामवंत स्टार्स सहभागी होणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;