आता तरी मला माफ करा..; त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शाहिद कपूरच्या पत्नीची विनंती

आता तरी मला माफ करा..; त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शाहिद कपूरच्या पत्नीची विनंती

अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतवर तिच्या एका कमेंटमुळे 2017 मध्ये बरीच टीका झाली होती. वर्किंग आईंचा अपमान करणारं वक्तव्य तिने केलं होतं. “माझी मुलगी पपी (कुत्र्याचं पिल्लू) नाही. आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवता येत नसेल तर त्यांना महिलांनी जन्मच का द्यावा”, असा सवाल तिने केला होता. आता त्या वक्तव्याबद्दल मीराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. काम करणाऱ्या आईंबद्दल मनात गैरसमज बाळगला होता, अशी कबुली तिने दिली आहे.

‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत मीरा म्हणाली, “माझ्यासारख्या सुशिक्षित महिलेनं लग्नानंतर घरी राहण्यास का निवडलं, घरी राहणारी आई हाच पर्याय का निवडला.. अशा प्रश्नांचा भडीमार करत मला त्यावेळी एका कोपऱ्यात ढकललं होतं. मला ती विचारसरणी अयोग्य वाटली होती. मला त्यावेळी माझ्या मुलांना वेळ द्यायचा होता. माझे विचार जुनाट असल्याचं ठरवून मला एका कोपऱ्याच ढकलण्यात आलं होतं. त्या रागातून मी तसं वक्तव्य केलं होतं. पण मी आता त्या मतांनी सहमत नाही. मला असं वाटतं की मी आता त्या गोष्टीच्या बरीच पुढे निघून आली आहे.”

“माझ्या वक्तव्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून का पाहिलं गेलं नाही, हे मी समजू शकते. त्यावेळी मी भावनिक होऊन तसं म्हणाले होते. माझ्या मते त्यावेळी मी फक्त स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. मी जो पर्याय निवडलाय, तो कसा योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. पण माझ्या वक्तव्यामुळे बऱ्याच लोकांची मनं दुखावली गेली. त्यामुळे मला त्याचं खूप वाईट वाटतं”, असं ती पुढे म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

मीराने वयाच्या विसाव्या वर्षी शाहिद कपूरशी लग्न केलं. कलाविश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली मीरा शाहिदसोबत लग्न केल्यानंतर प्रकाशझोतात आली. मात्र एका मुलाखतीत काम करणाऱ्या महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मीरा टीकाकारांच्या निशाण्यावर आली होती. ही घटना आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं सांगत त्याने मोठा धक्का बसल्याचं मीराने म्हटलंय. आजही त्या वक्तव्यामुळे नकारात्मक टिप्पण्यांचा सामना करावा लागतो, असं मीरा म्हणाली. त्या वक्तव्यानंतर शाहिदकडून खूप पाठिंबा मिळाल्याचा खुलासाही तिने केला. “मला असं वाटतं की मला त्याबद्दल आता माफ करण्याची वेळ आली आहे. कारण आयुष्य म्हणजे एक वर्तुळ असतं आणि इथे तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकता”, अशी भावना मीराने व्यक्त केली.

2017 मध्ये ‘वुमन्स डे’निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मीरा म्हणाली होती, “तुम्हाला माहितीये की मी माझ्या मुलीचं संगोपन करू शकते. मी एक चांगली पत्नी बनू शकते. त्यामुळे मला कोणीही अडवू शकत नाही. मला घरी राहायला आवडतं, मला माझ्या मुलीची आई व्हायला आवडतं. माझ्या मुलाबाळांसोबत मी एक तास घालवून ऑफिससाठी पळापळ करू शकत नाही. मग मी तिला जन्माला का घातलं? ती काही पपी (कुत्र्याचं पिल्लू) नाही. तिच्याजवळ मला तिची आई बनून राहायचंय. तिला मोठं होताना पाहायचंय.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;