जबरदस्तीने मुलाचे केले सेक्स चेंज ऑपरेशन, डॉक्टरांवर केले गंभीर आरोप
उत्तर प्रदेशमध्ये एका 20 वर्षी तरुणाचे जबरदस्तीने सेक्स चेंज ऑपरेशन करण्यात आले आहे. बेशुद्ध करून आपल्यावर सर्जरी केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. पण दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासाने या तरुणाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या ऑपरेशनसाठी या तरुणाने परवानगी दिली होती असे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की मुझफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय मुजाहिदला त्याच्याच ओळखीच्या असलेल्या ओमप्रकाश नावाच्या व्यक्तिने गोड बोलून त्याला या हॉस्पिटलमध्ये आणले. मुजाहिदला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि बेशुद्ध करून ही सर्जरी करण्यात आली. ओमप्रकाश आणि मुजाहिद हे दोघे एकमेकांना ओळखत होते. गेल्या दोन वर्षांपासासून ओमप्रकाश आपल्याला छळतोय असे मुजाहिदने म्हटले आहे. तसेच ओमप्रकाश आपल्याशी वाईट साईट गोष्टी करून घेतो असेही मुजाहिद म्हणाला आहे. ऑपरेशननंतर ओमप्रकाश आपल्याला भेटला आणि आणि आता तू पुरुष राहिला नसून तुझी महिला झाल्याचे मुजाहिदला सांगितले. इतकंच नाही तर तुला माझ्याशी लग्नही करावे लागले असेही ओमप्रकाशने मुजाहिदला सांगितले
दुसरीकडे हाॉस्पिटल प्रशासनाने मुजाहिदचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुजाहिद गेली दोन महिने आमच्या हॉस्पिटलमध्ये येत होता, त्याच्या सर्व चाचण्याही आम्ही केल्या इतकंच नाही तर सर्जरी करण्यापूर्वी मुजाहिदने संमतीही दर्शवली त्याचा व्हिडीओही आमच्याकडे असा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List