चाहत्यांना का आवडतोय ‘मुंज्या’चा थरार? सिनेमाच्या यशाची 3 मोठी कारणं
दोन आठवठ्यात 67.95 कोटी रुपयांची कमाई करणारा 'मुंज्या' सिनेमाना 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करतो की, नाही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
प्रेक्षक दुसरा कोणता नाहीतर, 'मुंज्या' सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. तर 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई का करत आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. त्यामागचं कारण जाणून घेऊ...
बॉलिवूडमध्ये कॉमेडी - हॉरर सिनेमांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. असं अनेक सिनेमांमध्ये पाहाण्यात आलं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा स्त्री, जान्हवी कपूर हिचा 'रुही' सिनेमांना चाहत्यांनी प्रेम दिले.
असंच काही 'मुंज्या' सिनेमासोबतदेखील झालं आहे. कॉमेडी - हॉरर आता प्रेक्षकांसाठी आवडता जॉनर ठरत आहे. हॉरर सिनेमांना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. सध्या सर्वत्र 'मुंज्या' सिनेमाची चर्चा रंगली आहे.
अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'क्रिश' सिनेमाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. 'क्रिश' सिनेमा 'कोई मिल गया' सिनेमाचा दुसरा भाग आहे. सिनेमात जादू या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंल. 'जादू' मुळेच सिनेमाचं महत्त्व वाढलं.
असंच काही 'मुंज्या' सिनेमासोबत देखील आहे. सिनेमात एक एनिमेटेड कॅरेक्टर आहे. ज्याने लोकांची उत्सुकता वाढली असून त्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार कमी बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आला आहे. फक्त 20 कोटीमध्ये सिनेमा तयार झाला आहे. तर सिनेमाने जवळपास 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सिनेमाची कमाई दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या दमदार कथेला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंज्याने आतापर्यंत जगभरात 83.46 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.









Comment List