Isha koppikar : ‘ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी….’, अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर बऱ्याच काळापासून चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. ईशा बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखली जाते. रामगोपाल वर्माच्या 'कंपनी' चित्रपटातील खल्लास हे तिच आयटम साँग खूप गाजलं होतं.
सध्या ईशा कोप्पीकर पुन्हा चर्चेत आहे. 29 वर्षानंतर तिने इंडस्ट्री संदर्भात काही मोठ धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘इश्क समुंदर’ आणि ‘खल्लास’ सारख्या गाण्यांसाठी आजही ईशा कोप्पीकरची आठवण काढली जाते.
ईशा कोप्पीकर Me Too बद्दलही मोकळेपणाने बोलली. मी टू मध्ये सत्य आहे. संस्कारांवर तुमचा विश्वास असेल, तर इंडस्ट्रीमध्ये तुमच टिकण कठीण आहे असं ती म्हणाली.
अनेक मुली अशा सुद्धा आहेत, ज्यांनी कास्टिंग काऊचच्या भीतीने इंडस्ट्री सोडली. तिथे मुलींना सांगितलं जातं की, आमच ऐका, नाही तर हार माना. इंडस्ट्रीमध्ये असे कमीच लोक आहेत, ज्यांनी हार मानली नाही, मी त्या पैकीच एक आहे असं ईशा म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List