जेव्हा लँडलाईनद्वारे चाहत्यांशी बोलायचे सेलिब्रिटी, माधुरी दीक्षितचा जुना व्हिडीओ व्हायरल
आजच्या धकाधकीच्या जीवनात जुने दिवस आठवले की फार चांगलं वाटतं. ते दिवस पुन्हा आले तर… त्या दिवसांच्या आठवणी… ते दिवस पुन्हा जगता आहे तर…, असं अनेकांना वाटत असेल. तेव्हा फार कोणाकडे लँडलाईन देखील नव्हते, मोबाईल तर लांबची गोष्ट…, त्याच दिवसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि व्हायरल होत असलेला व्हिडीओ अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा आहे. 90 च्या दशकात माधुरी हिच्या नावाचा सर्वत्र बोलबाला होता.
अभिनेत्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत माधुरी हिचं नाव देखील अव्वल स्थानी होतं. माधुरी हिच्या डान्सपुढे दुसऱ्या अभिनेत्री फिक्या होत्या. माधुरी हिने सौंदर्य, डान्स आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं. तेव्हा फक्त चाहतेच नाहीतर, सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीवर फिदा झाले होते.
माधुरी हिची एक झलक पाहाण्यासाठी चाहते देखील उत्सुक असायचे. दरम्यान, त्या काळातील म्हणजे जवळपास 28 वर्ष जुना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये माधुरी लँडलाईनद्वारे चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. एका चाहत्याने अभिनेत्रीला भेटण्यासाठी पेस्ट कंट्रोलचं देखील कारण दिलं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी चाहत्यांसोब बोलताना दिसत आहे. माधुरी एका चाहतीसोबत बोलताना दिसत आहे. चाहती म्हणते, तू माझी मैत्रीण होशील… यावर माधुरी म्हणते, ‘मी तुझी मैत्रीणच आहे…’ पुढे चाहती म्हणते, ‘तू प्रचंड स्वीट आहेस…’ तर चाहतीचा आवाज ऐकल्यानंतर माधुरी म्हणते, ‘तुझा आवाज देखील स्वीट आहे…’
तर एक चाहते अभिनेत्रीला भेटण्यासाठी पेस्ट कंट्रोलचं कारण देताना दिसत आहे. चाहता म्हणतो, ‘मी पेस्ट कंट्रोलमधून आहे.माझे कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर, तुम्ही पेस्ट कंट्रोल करायला हवं…’ यावर माधुरी हसते आणि म्हणते, ‘हो… माझ्या घरी खूप झुरळे आहेत, मला माझ्या जागी पेस्ट कंट्रोलची गरज आहे…’ सध्या सर्वत्र फक्त माधुरी हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, माधुरी दीक्षित फक्त अभिनेत्री नसून उत्तम कथक नृत्यांगना देखील आहे. माधुरी हिने कथक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. खुद्द अभिनेत्री देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List