अनिल कपूरचे आलिशान घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या होस्टची अब्जावधी संपत्ती
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय आहेत. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अनिल कपूर यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हमारे तुम्हारे’ सिनेमातून अनिल कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अनिल कपूर फक्त अभिनेते नाहीतर, अनेक सिनेमांची निर्मिती देखील त्यांनी केली आहे. एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेणारे अनिल कपूर जाहिरातींच्या माध्यमातून देखील गडगंज पैसे कमावतात.
अनिल कपूर यांची नेटवर्थ 140 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत त्यांचं आलिशान घर देखील आहे. अनिल कपूर यांच्याकडे एक दोन नाहीतर, तीन आलिशान घर आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये देखील आलिशान गाड्या आहेत. अनिल कपूर मुंबईतील जुहू येथील एका आलिशान बंगल्यात कुटुंबासोबत राहातात. या बंगल्यात महागडे फर्निचर आणि ॲक्सेसरीज आहेत, ज्याला अँटिक टच देण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण तीन घरे आहेत आणि या घरांची किंमत सुमारे 35 कोटी रुपये आहे.
अनिल कपूर यांचं कार कलेक्शन
अनिल कपूर यांना गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे पोर्श, बेंटले, बीएमडब्ल्यू, जग्वार आणि ऑडी अशा अनेक गाड्या आहेत. एवढंच नाहीतर, त्यांच्याकडे 1 कोटी 45 लाख रुपये किमतीची BMW लक्झरी कार देखील आहे.. त्यांच्या सर्व गाड्यांची किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये अनिक कपूर यांच्या संपत्तीमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनिल कपूर वर्षाला 12 कोटी रुपये कमवतात. अनिक कपूर मुंबई कुटुंबासोबत आलिशान आणि रॉयल आयुष्य जगतात.
‘बिग बॉस ओटीटी 3’साठी अनिक कपूर यांचं मानधन
रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस ओटीटी 3’ साठी अनिल कपूर एका एपिसोडसाठी 2 कोटी रुपये मानधन घेणार आहेत. आठवड्याला फक्त दोन दिवस अनिल कपूर होस्टची भूमिका सांभाळणार आहेत. ज्यासाठी शोच्या निर्मात्यांना एका आठवड्यासाठी अनिल कपूर यांच्यासाठी 4 कोटी रुपये मोजवे लागणार आहेत.
अनिल कपूर यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘सावी’ सिनेमाच्या माध्यमातून अनिल कपूर चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. चाहत्यांना देखील अनिल कपूर यांनी ‘बिग बॉस ओटीटी 3’ आणि ‘सावी’ सिनेमात पाहायचं आहे. सध्या सर्वत्र अनिल कपूर यांची चर्चा रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List