कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर बसलेयत, संजय राऊत यांची बोचरी टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेवरून राज्य सरकारवर टीका केली.
पत्रकारांनी वसईतील तरुणीच्या हत्याकांडाविषयी संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी राज्यातील कायदा व्यवस्था उद्धवस्त झाली आहे असे सांगितले. ”कोयता गँगचे सुत्रधार सरकारमध्ये बसले आहेत या राज्यातली कायदा व्यवस्था उद्धवस्त झाली आहे. सरकारच गुंडाच्या हातात आहे. गुंडांना पोसणाऱ्यांच्या हातात आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणूका जिंकण्यासाठी तुरुंगात फोन जात होते. त्या गुंडाना बाहेर काढलं गेलं व त्यांचा वापर करून लोकसभा निवडणूकीत नक्कीच झाला आहे. या सगळ्या गँगचा सूत्रधार सहाव्या माळ्यावर बसले आहेत”,असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List