प्रेमात अडथळा, प्रॉपर्टीसाठी आईनेच केला मुलांचा खून,  पोलिसांच्या तपासात सत्य समोर

प्रेमात अडथळा, प्रॉपर्टीसाठी आईनेच केला मुलांचा खून,  पोलिसांच्या तपासात सत्य समोर

शेतजमीन आणि संपत्ती मुलांना मिळू द्यायची नाही व प्रेमात अडथळा नको, या हेतूने आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या दोन मुलांचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात ही घटना घडली होती.

आई कविता सारंग पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) आणि प्रियकर सचिन बाबाजी गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही महिन्यांपूर्वी संगमनेरमधील हिवरगाव पावसा येथील रितेश सारंग पावसे (वय 12) आणि प्रणव सारंग पावसे (वय 8) या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. मात्र, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

मात्र, मुलांच्या मृत्यूबाबत गावकऱयांना संशय होता. कारण मृत मुलांच्या आईचे सावरगाव तळ येथील सचिन गाडे याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपासात प्रेम प्रकरणात अडथळा आणि प्रॉपर्टीसाठी मुलांचा खून करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे सदर महिला आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी महिला हिच्या पतीचेदेखील निधन झालेले आहे. त्या बाबतही आता कुजबूज सुरू आहे. महिलेच्या मयत पतीची मोठी शेतजमीन व संपत्ती मुलांच्या नावावर होईल. या दुहेरी हेतूने हा खून करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;