पुण्यात तरुण-तरुणीचा जीवघेणा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावरील इंस्टाग्रामचे अनेकांना वेड लागले आहे. रील्सला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट मिळाव्या यासाठी इंस्टाग्रामवरील तरुण आणि तरुणी वाट्टेल ते रील काढत आहेत. हे रील काढताना आपला जीव जाईल, याची किंचितशी भीती सुद्धा यांना नाही, हे अनेक घटनांवरून उघडकीस आले आहे. पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील न्रहे या भागातील स्वामीनारायण मंदिर परिसरात एका उंच इमारतीच्या गच्चीवरून एक तरुणी आपल्या मित्राचा हात धरून लटकली. तर दुसऱया बाजुला एक जण हे सर्व व्हिडीओ चित्रण करत आहे. जर या तरुणीचा हात सुटला असता तर ती खोल कोसळली असती आणि तिचा जीव सुद्धा गेला असता. परंतु, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धीसाठी केलेल्या रिल्समुळे पालकांची झोप उडाली आहे.
पोलीस कारवाई करणार का?
घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. या स्टंटचे चित्रीकरण करण्यासाठी कँमेरामनसुद्धा तिथे उपस्थित होता. कॅमेरामन त्यांच्याच बाजुला थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, तो आता व्हायरल झाला आहे. पोलीस यावर काही कारवाई करतात का याकडे लक्ष लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List