चंद्रपूर: पाऊस रुसला; तलावातील मासे मरू लागले, ट्रॅक्टरने दुसऱ्या तलावात सोडले
देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागाला मान्सूनने व्यापले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र देशातील उष्ण शहरातील उकाडा अद्यापही कमी झालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 40°c वरच आहे. दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी तापमानात फार घट झालेली नाही. बळीराजाला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे संकट डोक्यावर घोंगावत असल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
एकीकडे शेती संकटात सापडली असताना मत्स्य पालनावर सुद्धा संकट ओढावले. पाऊस नसल्याने तलावातील पाण्याची पातळी घटली. त्यात तापमानाच्या पाराही वाढला. वाढलेल्या तापमानाने तलावातील मासे मरू लागलेत. धाबा येथील मत्स्य पालन संस्थेने लाखो रुपयाचे मासे मंगलपेठ तलावात सोडले होते. दमदार पावसाच्या अंदाज दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात मासे दगावण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे या तलावातील मासे दुसऱ्या तलावात सोडण्याचा निर्णय संस्थेने घेतला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आधी पाणी सोडण्यात आलं. या पाण्यात तलावातील जिवंत मासे सोडले गेले. जवळपास सात कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलातील मोठ्या तलावात ट्रॅक्टर द्वारे मासे सोडण्यात आले. दमदार पावसासाठी बळीराजा आता देवाकडे साकडे घालताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List