रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नका

रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नका

लोकसभा निवडणुकीत संशयास्पद विजय मिळालेले मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांची खासदारकी वादात सापडली आहे. मतमोजणी पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने न झाल्याने वायकर यांचा विजय हा वादग्रस्त व शंकास्पद आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदारकीची शपथ देऊ नये, अशी मागणी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत खिमजी शाह यांनी लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सिंग यांना अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे.

हिंदुस्थानात प्रथमच उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन मतमोजणीबाबत एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल, असे भरत शाह यांनी लोकसभा सरचिटणीसांना पाठवलेल्या नोटिसीत नमूद केले आहे. वायकर यांचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल पह्न घेऊन हजर होता. तो पह्न ईव्हीएम मशीनसोबत जोडलेला होता असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, याकडेही या नोटिसीत लक्ष वेधले गेले आहे.

z उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी पेंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व पेंद्र सरकार मदत करीत आहे, असेही भरत शाह यांनी नमूद केले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही शाह यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;