योग दिवस 2024: या अभिनेत्रींनी योगातूनच अंगीकारला फिटनेसचा मंत्र, शिकलात तर होईल फायदा

योग दिवस 2024: या अभिनेत्रींनी योगातूनच अंगीकारला फिटनेसचा मंत्र, शिकलात तर होईल फायदा

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करणे खूप महत्त्वाचे बनले आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी योगा हा चांगला पर्याय आहे. योगा केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवत नाही तर मन शांत ठेवण्यास देखील मदत करतो. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी योगा करतात. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा आणि करीना या अभिनेत्री वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही सुंदर आणि फिट दिसतात. त्यांच्या सुंदर आणि तरुण दिसण्यामागील रहस्य योगा आहे. आज योग दिन 2024 च्या खास प्रसंगी जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्री योगा करतात.

मलायका अरोरा

बॉलीवूडच्या फिटेस्ट अभिनेत्रींच्या यादीत पहिले नाव मलायका अरोरा हिचे आहे. जी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिम आणि योगा करते. प्रत्येकाला तिच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्यायचे असते. मलायका अरोरा योगाने स्वतःला फिट ठेवते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


शिल्पा शेट्टी

या यादीत दुसरे नाव शिल्पा शेट्टीचे आहे. फिटनेससोबतच अभिनयानेही तिने चाहत्यांना वेड लावले आहे. शिल्पा शेट्टीने 17 वर्षांपूर्वी योगाचा प्रवास सुरू केला होता. ती तिच्या Instagram आणि Youtube चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करतात.

कंगना राणौत

अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना राणौत देखील जिममध्ये नाही तर योगा करून स्वतःला फिट ठेवते. तिने असेही सांगितले आहे की तिला चक्रासन, नौकासन, पद्मासन आणि शिरशासन करायला आवडते. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन वयाच्या ४८ व्या वर्षीही खूप फिट आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते. सुष्मिताही तिचे फिटनेस व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सुष्मिताचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात ती रोहमन शॉलसोबत योगा करताना दिसली होती. त्याने कोरोनाच्या काळात त्याचे अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

करीना कपूर

करीना कपूर आपल्या दोन मुलांच्या जन्मानंतर ज्या प्रकारे वजन कमी केले ते पाहून सर्वांना नव्वल वाटले होते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना जीममध्ये घाम गाळत नाही तर घरी योगा करते. करीना रोज योगा करायला विसरत नाही. करिनाने योगा करतानाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;