Pune Crime News : पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, फुरसुंगीत धक्कादायक घटना

Pune Crime News : पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, फुरसुंगीत धक्कादायक घटना

पुण्यातील फुरसुंगीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. फुरसुंगी येथे पॉवर हाऊसजवळ टँकरमधून पाणी सोडताना सदर घटना उघडकीस आली.

सदर घटना फुरसुंगी येथे घडली असून मृत महिलेचे नाव कौशल्या मुकेश चव्हाण (वय 25) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टँकर मालक पुरुषोत्तम ससाणे यांनी बुधवारी (19 जून) संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास हांडेवाडी येथे घराशेजारी टँकर पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी (20 जून) ते टँकर फुरसुंगी येथे पॉवर हाऊसजवळ घेऊन गेले आणि टँकरमधून पाणी सोडायला सुरुवात केली. मात्र टँकरमधून पाणी आले नाही. त्यामुळे टँकर खोलून पाहिला असता आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर महिलेची हत्या झाली की तिने आत्महत्या केली? याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;