आळंदीत 275 रक्तदात्यांनी केले रक्तदान; आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

आळंदीत 275 रक्तदात्यांनी केले रक्तदान; आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

आळंदी येथील श्री आळंदी धाम सेवा समितीचे वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 275 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास मोठा प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित नेत्रतपासणी शिबिरात 321 जणांची तपासणी करण्यात आली. यात 211 नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह चष्मे वाटप करण्यात आल्याचे संयोजक समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले.

रक्तदान व आरोग्य शिबिराचे उद्घाटन भगवान पोखरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी योगी निरंजननाथ, नितीन गोरे, डी. डी. भोसले, डॉ. राम गावडे, प्रकाश वाडेकर, सतीष मोटे, ज्ञानेश्वर वीर, सचिन गिलबिले, महेश शेवकरी, प्रकाश कुऱ्हाडे, मोहन महाराज शिंदे, किरण येळवंडे, सचिन काळे, सुनील काटे, धनंजय पठारे, रमेश वहीले, वंदना आल्हाट, संकेत वाघमारे, मनोहर दिवाणे, साईनाथ ताम्हणे, नितीन ननवरे, किशोर देशपांडे, ज्ञानेश्वर गारकर, राजेश नागरे, प्रदिप तळेकर, धनंजय मुंगसे, परसराम धनवडे, अक्षय पाटील, अजय पवार, सुयोग भालेकर आदी उपस्थित होते.

रक्तदान व आरोग्य शिबिरास कमलेश हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, धारा हॉस्पिटल, सुर्या नेत्रालय तसेच वेदश्री तपोवन यांचे सहकार्य मिळाले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करीत उपक्रमाचे कौतुक केले. केले. या शिबिरात महिलांनी देखील उत्साही प्रतिसाद देत रक्तदान केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;