द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; मात्र, RBI कडून ग्राहकांना दिलासा

द सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; मात्र, RBI कडून ग्राहकांना दिलासा

रिझर्व बँक ऑफ इंडियाची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर करडी नजर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोटक महिंद्रा बँक, पेटीएम बँक तसेच अनेक सहकारी बँकांवर आरबीयने कारवाईचा बडगा उभारला आहे. अशातच आता मुंबईतील The City Co-operativ Bank Ltd आरबीआयच्या रडारवर असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने मुंबईतील The City Co-operativ Bank Ltd या बँकेचा परवाना रद्द केला आहे. मार्गदर्शन तत्वे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे तसेच पुरेसा निधी बँकेत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिटी बँकेला आरबीआयने अनेक वेळा सुधारणा करण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र सिटी बँकने आरबीआयच्या सुचनांकडे वारंवार दुर्लक्ष केले, तसेच त्यांच्या कामकाजात कोणताही बदल आरबीआयला दिसला नाही. त्यामुळेच आरबीआयने ही कारवाई केली आहे.

सिटी बँकेचा परवाना रद्द केला असला तरी ग्राहकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. त्याची नियमावली आरबीआयने जाहिर केली आहे. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बँकेत खाते असलेल्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळणार आहे. ग्राहकाच्या खात्यात 5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर ती रक्कम सध्या मिळणार नाही. त्यामुळे फक्त 5 लाख रुपये ग्राहकांना काढता येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;