चार लेकरांना सोडून युट्यूबर दोन पत्नींसोबत बिग बॉसमध्ये होतोय सहभागी, अखेर अरमान, पायल आणि कृतिका…

चार लेकरांना सोडून युट्यूबर दोन पत्नींसोबत बिग बॉसमध्ये होतोय सहभागी, अखेर अरमान, पायल आणि कृतिका…

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. आज अरमान मलिक हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अरमान मलिक आपल्या लाईफबद्दलची सर्व माहिती लोकांसोबत शेअर करतो. अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच कृतिका हिच्यासोबत अरमानने लग्न केले. पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. कृतिका मलिक हिला एक मुलगा आहे. अनेकदा लोक हे अरमान मलिक याला खडेबोल सुनावताना दिसतात.

आता अरमान मलिक, पायल आणि कृतिका यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नीसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होणार आहे. अरमान मलिक बिग बॉस ओटीटी 3 मध्ये काय धमाका करतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. लहान मुलांना घरी ठेऊन पायल आणि कृतिका बिग बॉसमध्ये दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच एक चर्चा जोरदार रंगताना दिसली होती की, अरमान मलिक हा आता तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. तो एका मुलीला डेट करत आहे. मात्र, त्यानंतर अरमान मलिक याने एक मुलाखत दिली आणि त्याने स्पष्ट केले की, तो तिसऱ्यांदा प्रेमात पडला नाहीये आणि तिसरे लग्न करण्याचा तो अजिबातच विचार करत नाहीये. आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदी असल्याचे देखील त्याने म्हटले.

काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अरमान मलिक याने स्पष्ट केले की, आपण 200 कोटींच्या संपत्तीचे मालक आहोत. फक्त हेच नाही तर अरमान मलिक याच्याकडे तब्बल 10 फ्लॅट्स आहेत. अत्यंत आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील अरमान मलिक याच्याकडे आहे. अत्यंत लग्झरी अशी लाईफस्टाईल अरमान मलिक जगतो.

टिकटॉकच्या माध्यमातून तो दर महिन्याला अडीच लाखांपेक्षा अधिक कमाई करत होता. हेच नाही तर फक्त आठवीपर्यंतच शिक्षण हे अरमान मलिक याचे झाले आहे. अरमान मलिक हा काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये धमाल करताना दिसला. पायल मलिक हिच्यासोबत तो दुबईला गेला होता. दुबईतील अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांचे व्हायरल होताना दिसले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;