‘ठरलं तर मग’चा वटपौर्णिमा विशेष भाग; सायलीसाठी अर्जुननेही केला उपवास
वरुणराजाचं आगमन झालं की चाहूल लागते ती वटपौर्णिमा सणाची. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा सण प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्येही उत्साहात साजरा होणार आहे. टीआरपीच्या यादीत नंबर वन असलेली मालिका 'ठरलं तर मग'मध्ये यंदाची वटपौर्णिमा खास ठरणार आहे.
सायली-अर्जुनचं नातं बहरू लागलं आहे. दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नसली तरी मनात मात्र जन्मोजन्मी आम्हाला एकमेकांची साथ लाभू दे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
यंदा वटपौर्णिमेची पूजा सायली तर करणारच आहे. पण सायलीसोबत अर्जुनही वडाभोवती सात फेऱ्या घेऊन हे व्रत पूर्ण करणार आहे. अर्जुनने सायलीसाठी उपवासही केला आहे. 'ठरलं तर मग'च्या वटपौर्णिमा विशेष भागात प्रेक्षकांना यापुढील कथा पहायला मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List