उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीसींचा कोकण रेल्वेने केला सन्मान, फुकट्या प्रवाशांकडून 21 कोटींचा दंड वसूल
कोकण रेल्वेमार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीसांचा सन्मान करण्यात आला. या आर्थिक वर्षात तिकीट तपासनीसांनी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या काही काळात कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळींच्या विरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेमार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासनीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत 78 हजार 115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासनीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासनीसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List