गोळीबार होऊनही फक्त ‘या’ कारणामुळे सलमान खान सोडत नाहीये गॅलेक्सी अपार्टमेंट, अखेर मोठे कारण..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळताना दिसत आहे. सलमान खान याला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून अनेक योजना आखल्या जात आहेत. या प्रकरणात गँगच्या अनेक सदस्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले. सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार करण्यात आला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. हेच नाही तर सलमान खानच्या पनवेल येथील घराची रेकी देखील लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून करण्यात आलीये.
सलमान खानला सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केलीये. सलमान खान हा आपल्या कुटुंबासोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमान खान आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. मात्र, असे असतानाही सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो? कारण म्हणावी तेवढी गॅलेक्सी अपार्टमेंट त्याच्यासाठी सुरक्षेत नाहीये.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंट न सोडण्याचे कारण सांगताना सलमान खान दिसला. सलमान खानला विचारण्यात आले की, तू इतका मोठा सुपरस्टार आहेस आणि करोडो रूपये कमाई करतो तर मग एका बेडरूमच्या हॉलमध्ये का राहतोस?
यावर सलमान खान हा म्हणाला की, खरतर तो तीन बेडरूमचा हॉल आहे पण तो एक बेडरूमचा हॉल कसा बनला हे मला माहीत नाही. सलमान खान पुढे म्हणाला की, मुळात म्हणजे व्यस्त दिवसानंतर ज्यावेळी आई वडिलांसोबत आराम करायला मिळतो, त्यावेळी खूप जास्त छान वाटते. जेंव्हा मी वरच्या मजल्यावर जातो तेंव्हा आई आणि वडिलांच्या शेजारी झोपतो.
सलमान खान याला आई वडिलांचे घर सोडायचे नाहीये. यामुळे मोठ्या संपत्तीचा मालक असतानाही सलमान खान हा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहतो. मध्यंतरी अशी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, सलमान खान हा गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार आहे. मात्र, त्यानंतर स्पष्ट करण्यात आले की, सलमान खान काहीही झाले तरीही गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच राहणार आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबाराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List