आईने 20 महिन्यांच्या चिमुरड्याला जबरदस्तीने पाजली सिगारेट; फोटो व्हायरल
आसाममधील सिलचरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला धुम्रपान आणि मद्यपान करण्यास भाग पाडले आहे. याबाबतचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल झाल्यामुळे चाईल्ड हेल्पलाईनला याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी त्या आईला ताब्यात घेतले आहे.
सदर घटनेची पुष्टी आसाम ट्रिब्यून या वृत्तपत्रातून करण्यात आले आहे. दरम्यान चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ही घटना सिलचरच्या चेंगकुरी भागात घडली. येथे एका आईने आपल्या तान्ह्या बाळाला जबरदस्तीने सिगारेट आणि दारू पिण्यास भाग पाडले. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही या घटनेची बातमी पोलिसांना दिली असून त्य़ांनी त्या आईला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
In an absolutely disturbing incident, a woman has been found to allegedly force her 20-month-old child to smoke cigarettes and even drink alcohol. The incident took place in the Chengkuri area of Silchar on Wednesday night.
The Child Helpline Cell received a complaint with… pic.twitter.com/fwPZ593pts— ForMenIndia (@ForMenIndia_) June 15, 2024
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताच नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. अनेक युजर्सनी या महिलेचा तीव्र निषेध केला आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी या लहान बाळाला अशा आईकडे ठेवणे चूकीचे आहे. त्याला एका चांगल्या घरात दत्तक द्या, अशी मागणी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List