ऑनरकिलिंगमधून करंजोशीतील तरूणाचा खून; मुलीची छेड काढल्याच्या रागातून मारहाण

ऑनरकिलिंगमधून करंजोशीतील तरूणाचा खून; मुलीची छेड काढल्याच्या रागातून मारहाण

कराड तालुक्यातील करंजोशी येथील रोहिदास मारुती पन्हाळकर (वय 21) या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांना यश आले. हा खून मुलीची छेड काढल्याच्या कारणातून झाला असल्याचे तपासात समोर आले. ऑनरकिलिंगमधून ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांना अटक केली असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समाकेश आहे.

ओंकार हणमंत पन्हाळकर (कय 20), निखिल रमेश पन्हाळकर (कय 22), रोहित मारुती पवार (वय 21, सर्व रा. करंजोशी, ता. कराड), आदित्य नामदेक पवार (वय 18, रा. गडकरआळी, सातारा), साहिल जयसिंग पिंपळे (वय 19, रा. मालोशी, ता. पाटण), तेजस सचिन पन्हाळकर (वय 21, रा. करंजोशी, ता. कराड), कुमार एकनाथ पन्हाळकर (वय 22, रा. करंजोशी), देवेंद्र बनाजी घाडगे (वय 28, रा. करंजोशी, ता. कराड), एक विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सातारा तालुक्यातील नागठाणे येथे रात्री आठ वाजता रोहिदास पन्हाळकर याला काही युवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर दोन तरुणांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या या प्रकरणाचा तपास सुरू केला.

रोहित पवार, ओंकार पन्हाळकर या दोघांनी रोहिदास याला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले होते. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी सांगितलेली हकीकत आणि गुन्हा घडलेल्या परिस्थितीमध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलिसांचा या दोघांकर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच, या दोघांनी इतर तरुणांना सोबत घेऊन खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सातजणांना विविध ठिकाणांहून अटक केली. मुलीच्या छेडछाडीतून रोहिदास याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक अरुण देककर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रकींद्र तेलतुंबडे, सहायक निरीक्षक पृथ्कीराज ताटे, सुधीर पाटील, उपनिरीक्षक किश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार सुधीर बनकर, किजय कांबळे, संजय शिर्के, आतिश घाडगे, नीलेश फडतरे, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, मनोज जाधक, अमित माने, अरुण पाटील, सनी आवटे, अमित झेंडे यांनी कारवाईत भाग घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;