मक्केत मरण पावलेल्या 645 हज यात्रेकरूंमध्ये 68 हिंदुस्थानी, सौदीच्या अधिकारी सूत्रांकडून माहिती

मक्केत मरण पावलेल्या 645 हज यात्रेकरूंमध्ये 68 हिंदुस्थानी, सौदीच्या अधिकारी सूत्रांकडून माहिती

सौदी अरेबियातील एका अधिकाऱ्यानं बुधवारी सांगितलं की, या वर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भिती देखील व्यक्त होत आहे.

‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो’, असं अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितलं.

इस्लाममध्ये हजच्या यात्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सौदीतील दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी एएफपीला सांगितलं की हज दरम्यान 550 मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र एएफपीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 645 आहे.

त्या आकडेवारीत 323 इजिप्शियन आणि 60 जॉर्डनचा समावेश होता, असं अरबी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि जवळजवळ सर्वजण ‘उष्णतेमुळे’ मरण पावले.

इंडोनेशिया, इराण, सेनेगल, ट्युनिशिया आणि इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशाने देखील मृत्यूची पुष्टी केली आहे, मात्र अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी कारण स्पष्ट केलेले नाही.

गेल्या वर्षी 200 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियाचे होते. सौदी अरबने अधिकृतरित्या मृत्यूची माहिती दिलेली नाही.

हिंदुस्थानींच्या मृत्यूची पुष्टी करणारे अधिकारी म्हणाले की काही हिंदुस्थानी यात्रेकरू बेपत्ता आहेत, परंतु त्यांनी अचूक संख्या सांगण्यास नकार दिला.

‘असं दरवर्षी घडतं… आम्ही असं म्हणू शकत नाही की यावर्षी ही संख्या जास्त आहे’, असंही तो म्हणाला.

‘हे काहीसे गेल्यावर्षीसारखंच आहे पण येत्या काही दिवसात आम्हाला अधिक माहिती मिळेल’, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या सौदी अभ्यासानुसार, ज्या भागात विधी केले जातात त्या भागातील तापमान प्रत्येक दशकात 0.4 अंश सेल्सिअसने (0.72 अंश फॅरेनहाइट) वाढत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;