तीन अपत्ये असल्यास गृहनिर्माण सोसायटीची निवडणूक लढवता येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

तीन अपत्ये असल्यास गृहनिर्माण सोसायटीची निवडणूक लढवता येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

तीन अपत्ये असल्यास कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. ही माहिती लपवून निवडणूक जिंकली तरी त्या लोकप्रतिनिधीला अपात्र करणारा नियम आहे. हा नियम गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीलाही लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्या. अविनाश घरोटे यांच्या एकल पीठाने हा निर्वाळा दिला आहे. तीन अपत्ये असलेल्या पश्चिम उपनगरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षाला अपात्र ठरविणाऱया उपनिबंधकाच्या आदेशावर न्या. घरोटे यांनी शिक्कामोर्तब केले.

n महाराष्ट्र को.ऑ.हौ. सोसायटी कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या पदाधिकाऱयाचे पद रद्द करण्याची कोणतीच तरतूद नाही, असा दावा सिंग यांनी केला होता.

n दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास सोसायटी पदाधिकाऱयाला अपात्र करण्याची तरतूद नियमात आहे. नियमानुसारच सिंग यांना अपात्र करण्यात आले आहे. उपनिबंधकांचे आदेश योग्य असल्याचा युक्तिवाद अॅड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी केला.

काय आहे प्रकरण…

कांदिवली, चारकोपच्या  एकता नगर को.ऑ.हौ. सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंग यांनी ही याचिका केली होती. त्यांच्या अध्यक्षपद निवडीला दीपक तेजल व रामाचल यादव यांनी आव्हान दिले होते. सिंग यांना तीन अपत्ये आहेत. त्यांना अपात्र करावे, अशी मागणी उपनिबंधक (म्हाडा, को.ऑ. हौ. सोसायटी) यांच्याकडे करण्यात आली. उपनिबंधक यांनी सिंग यांना अपात्र केले. त्याविरोधात सिंग यांनी याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायालयाचे निरीक्षण

तीनपैकी एक अपत्य माझे नाही. तो मुलगा शिक्षण घेण्यासाठी आपल्या घरी राहतो, असे सिंग यांचे म्हणणे होते. त्या मुलाचा जन्म दाखला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सिंग जन्म दाखला सादर करू शकले नाहीत. रेशन कार्डवर त्या मुलाचे नाव आहे. याचा अर्थ तो मुलगा त्यांचाच आहे. सिंग यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट होत असल्याने उपनिबंधकांच्या आदेशात कोणताच दोष नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;