वन विभागाकडून कुंभारीच्या  शासकीय वाळु डेपो ठेकेदारावर  गुन्हा दाखल

वन विभागाकडून कुंभारीच्या  शासकीय वाळु डेपो ठेकेदारावर  गुन्हा दाखल

कोपरगाव तालुक्यातील कुभांरी शासकीय वाळु डेपो ठेकेदार श्रीकांत गोमासे यांचेवर संरक्षित वनामधुन विनापरवाना रस्ता तयार करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील शासकीय यंत्रणे मध्ये खळबळ उडाली आहे.

माहेगाव देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी कोपरगाव वन विभागाकडे माहेगाव देशमुख संरक्षित वनामधुन वाळु वाहतूक करणेकामी सातशे मिटर लांबी च्या पुढे मुरुम टाकून रस्ताच्या आड येणार्‍या वनामधिल 250 च्यावर(प्रासिपिस)वेडीबाभुळ झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी कोपरगाव वनपरिक्षेत्राचे परिमंडळ वन अधिकारी बि. एन गाढे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत  वनविभागाने तातडीने कार्यवाही करत श्रीकांत गोमासे संगमनेर यांचेवर भारतीय वन अधिनियम 1972 चे कलम 26(2) अ ड ह फ ग अन्वये शासकिय मालमत्तेचे अंदाजे 50 हजार रुपये नुकसान केल्या प्रकरणी वनपाल बि. एन गाढे यांनी गुन्हा नोदंवत वनसंरक्षक अहमदनगर यांना पुढील कार्यवाही साठी रिपोर्ट सादर केला.

याबाबत अधिक माहिती देताना वनपाल गाढे यांनी पुढे सांगितले की विनापरवाना रस्त्ता तपासणी करत असतांना, ‘सदर रस्त्याने डंपर वरिल ड्रायव्हर याने कुंभारी सरकारी वाळु डेपोसाठी वाहतूक करत असल्याचे सांगितले. राखीव वनामधुन रस्ता तयार करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याने डंपर कारवाई साठी कोपरगाव येथे घेवून जात असतांना वाळु डेपो चालक यांनी भ्रमणध्वनी द्वारे फोन करुन दबावाखाली डेपो मध्ये डंपर मधिल वाळु खाली करुन डंपर पळवल्याचे गाढे यांनी आपल्या     तक्रार  अहवालात नमूद केले आहे .

आदिवासी बांधवांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यास वनविभाग तातडीने अटकेची कारवाई करते, आम्हास एक व दुसऱ्यास वेगळा न्याय – उत्तम पवार, एकलव्य संघटना

मोफत वाळू योजने अंतर्गत मिळणारे लाभ गरीब लोकांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळते, या योजने अंतर्गत 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू गरीबांना मिळते.सोबतच 5 ब्रास पेक्षा जास्त वाळू पाहिजे असेल, तर प्रती ब्रास 600 रुपये दराने वाळू खरेदी करता येते.लाभार्थ्यांना केवळ वाळू वाहतूकीचा खर्च लागतो. मात्र प्रत्यक्षात वाळू दोन ते अडीच हजार रुपये  ब्रास मिळते

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;