सोनाक्षी सिन्हावर कुटुंबाची नाराजी कायम, आई वडिलांच्या घरी नाही लागणार हळद, थेट ‘या’ ठिकाणी…

सोनाक्षी सिन्हावर कुटुंबाची नाराजी कायम, आई वडिलांच्या घरी नाही लागणार हळद, थेट ‘या’ ठिकाणी…

सोनाक्षी सिन्हा सध्या तूफान चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न करतंय. झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करत असल्याने सोनाक्षी सिन्हाचे आई वडील नाराज आहेत. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मुळात म्हणजे झहीर इक्बाल याच्या कुटुंबियांना या लग्नाची काहीच समस्या नाहीये. झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नाला ते सपोर्ट करत आहेत. मात्र, सोनाक्षी सिन्हाच्या या निर्णयामुळे तिचे कुटुंबिय नाराज आहेत.

सोनाक्षी सिन्हा ही आई वडिलांचे घर सोडून काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील तिच्या स्वत:च्या घरात शिफ्ट झालीये. सोनाक्षी सिन्हाचे आई वडील तिच्यावर इतके जास्त नाराज आहेत की, सोनाक्षी सिन्हाला हळद देखील आई वडिलांच्या घरात लागणार नाहीये. बांद्रातील घरातच हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सोनाक्षीला हळद लागणार आहे.

कुटुंबातील काही सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये सोनाक्षी सिन्हाचा हळदीचा कार्यक्रम होईल. आई पूनम सिन्हा, वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव सिन्हा यांचा या लग्नाला विरोध असल्याचे कळत आहे. हेच नाही तर आई पूनम सिन्हा यांनी सोशल मीडियावरूनही सोनाक्षी सिन्हाला अनफॉलो केले आहे. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या विरोधात आईचा आहे.

यामुळेच सोनाक्षी सिन्हाला आई वडिलांच्या घरी हळद लागणार नाहीये. उद्या (20 जून 2024) सोनाक्षी सिन्हाच्या बांद्रातील घरामध्येच हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना आता सुरूवात झालीये. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. शेवटी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाईल.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हाच्या बॅचलरेट पार्टीचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसले. मात्र, अभिनेत्रीच्या या फोटोंमध्ये घरातील एकही सदस्य दिसला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;