Jammu Kashmir : भाविकांच्या बसवर हल्ला करण्यात हकीमची दहशतवाद्यांना मदत, पोलिसांनी केली अटक

Jammu Kashmir : भाविकांच्या बसवर हल्ला करण्यात हकीमची दहशतवाद्यांना मदत, पोलिसांनी केली अटक

एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी आरोपी हकीमला अटक केली आहे. हकीमने दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. रियासी दहशतवादी हल्लाप्रकरणातील ही पहिली अटक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हकीम दीन हा राजौरी येथील रहीवासी आहे आणि हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 9 जूनला शिवखोडी येथून रियासी जिल्ह्यातून कटराला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस दरीत कोसळली. त्यात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह 33 जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी जंगलात लपून भ्याड हल्ला केला होता. ज्यामुळे बस चालक घाबरला आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले.

गृह मंत्रालयाने दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण 17 जून रोजी एनआयएकडे सोपवले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचे स्केच प्रसिद्ध केले होते आणि त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. रियासीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा म्हणाल्या की, रियासी येथील दहशतवादी  हल्ल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तो मास्टरमाईंड नाही आहे, मात्र या हल्ल्यात तो सामील होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;