ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचे मोठे विधान, पश्मिना म्हणाली, कुटुंबाचा वारसा आता…

ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचे मोठे विधान, पश्मिना म्हणाली, कुटुंबाचा वारसा आता…

अभिनेता ऋतिक रोशन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऋतिक रोशनची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. नेहमीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात धमाल करताना दिसतात. ऋतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते. ऋतिक रोशन आणि सबा दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सबा आझाद हिने ऋतिक रोशनला डेट करत असल्याने आपल्याला काम मिळत नसल्याचे म्हटले.

आता ऋतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन ही बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी तयार आहे. ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. पश्मिना रोशन ही आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे. नुकताच पश्मिना रोशन हिने चुलत भाऊ ऋतिक रोशन याच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

पश्मिना रोशन हिने म्हटले की, हृतिकच्या पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची बरोबरी करणे खूप कठीण आहे. कधी कधी मी वडिलांची गाणे ऐकते आणि त्यांच्या कलेशी कधी बरोबरी करू शकेल का याचा विचार करते. पश्मिना पुढे म्हणाली की, मी या गोष्टींकडे दबाव म्हणून नव्हे तर एक स्वप्न म्हणून नक्कीच पाहते.

हृतिक कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यात यशस्वी ठरला आहे. मला देखील वाटते की, मी हे करू शकते. अभिमान वाटेल असे काम मला करायचे आहे. सध्या मी नक्की थोडी चिंताग्रस्त आहे. पश्मिना रोशन ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. पश्मिना रोशन सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे.

पश्मिना रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता पश्मिना रोशनचा हा चित्रपट काय धमाका करतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटात रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझही बघायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;