बिग बींनी पुन्हा केली तीच चूक; ऐश्वर्या रायचे चाहते झाले नाराज, म्हणाले..

बिग बींनी पुन्हा केली तीच चूक; ऐश्वर्या रायचे चाहते झाले नाराज, म्हणाले..

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रावण’ या चित्रपटाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त एका सोशल मीडिया युजरने ‘रावण’ चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत अभिषेक आणि ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी या ट्विटला त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर रिपोस्ट केला असून त्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘रावण’ या चित्रपटाविषयी लिहिताना त्यांनी मुलगा अभिषेकचं भरभरून कौतुक केलंय. मात्र सून ऐश्वर्याचा साधा उल्लेखही न केल्याने चाहते पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. याआधीही बिग बींनी अशाच एका चित्रपटाच्या पोस्टमध्ये ऐश्वर्याचा उल्लेख करणं टाळलं होतं. तेव्हासुद्धा अभिनेत्रीच्या चाहत्यांनी बिग बींवर नाराजी व्यक्त केली होती.

‘रावण’ या चित्रपटासंबंधीची पोस्ट शेअर करत बिग बींनी लिहिलं, ‘अभिषेकची अविस्मरणीय कामगिरी.. त्याच्या इतर चित्रपटांमधील भूमिकेपेक्षा ही पूर्णपणे वेगळी आहे आणि हेच एका कलाकाराचं खरं मूल्य आहे. खूप सारं प्रेम!’ या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटातील अभिषेकची नायिका अर्थात ऐश्वर्याचा उल्लेखसुद्धा केला नाही. याआधी ‘बंटी और बबली’ या चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यातील गाजलेल्या ‘कजरा रे’ या गाण्याविषयी लिहिताना त्यांनी ऐश्वर्याचा उल्लेखच केला नव्हता. ‘कजरा रे’ हे गाणं मुख्यरित्या ऐश्वर्यावरच चित्रित झाला होता, तरी बिग बींनी तिचं नाव घेणं टाळलं, यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘सर, ऐश्वर्यानेही या चित्रपटात दमदार काम केलं होतं. तिच्या अभिनयाची प्रशंसा न करणं चुकीचं आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘या व्हिडीओत दिसणाऱ्या अभिनेत्रीनेही खूप चांगला अभिनय केला होता. तिचं कौतुक करणार नाही का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘तुम्ही प्रत्येक वेळी ज्याप्रकारे अभिषेकची साथ देता, त्याचं कौतुक करता.. त्याचप्रमाणे सून ऐश्वर्याचंही कौतुक का करत नाही’, असाही प्रश्न नेटकऱ्यांनी बिग बींना विचारला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;