हर्षेसच्या चॉकलेट सिरपमध्ये मेलेला उंदीर, महिलेने शेअर केला व्हिडीओ

हर्षेसच्या चॉकलेट सिरपमध्ये मेलेला उंदीर, महिलेने शेअर केला व्हिडीओ

आयस्क्रिममध्ये बोट सापडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हर्षेसच्या चॉकलेट सिरपमध्ये मेलेला उंदीर सापडला आहे. हा उंदीर सिरपच्या सिलबंद बाटली उघडल्यावर सापडला आहे. एका महिलेने याबाबतचा इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर  केला आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे, एका महिलेने हा व्हिडीओ शेअर केला असून तिने दावा केला आहे की, हर्षेसच्या चॉकलेट सिरपच्या सीलबंद बाटलीत एक मेलेला उंदीर सापडला आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रामी नावाच्या एका यूजरने लिहीले आहे की, मी झेप्टोवरुन ऑर्डर केलेल्या सामानामध्ये एक धक्कादायक गोष्ट मिळाली. हे सर्वांच्या माहितीसाठी आणि सावधतेसाठी पोस्ट करत आहे. त्यानंतर ती बंद झाकण खोलून सीरप एका कपमध्ये ओतते. यामध्ये तिला मेलेला उंदीर सापडला आहे. इंस्टा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी त्यावर पाणी ओतते.

महिलेने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, आम्ही ब्राऊनी केकसोबत झेप्टोवरुन हर्षेस चॉकलेट सिरपची ऑर्डर केली होती. त्यानंतर ते सिरप खोलले आणि डिस्पोजल ग्लासात ते सिरप ओतले. त्यावेळी त्यात मेलेले उंदीर दिसला. तो नेमका उंदीरच आहे की दुसरं काही हे आणखी जाणण्यासाठी त्यावर पाणी ओतले त्यावेळी खात्री झाली की तो मेलेला उंदीर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prami Sridhar (@pramisridhar)

चॉकलेट सीरप कंपनी हर्षेसने महिलेच्या पोस्टवर रिप्लाय केला आहे. ती म्हणाली, आम्हाला हे पाहून फार दु:ख झाले, कृपया आम्हाला त्या बाटलीचा यूपीसी आणि मॅन्यूफॅक्चरींग कोड [email protected] यावर रेफरेंस नंबर 11082163 सोबत पाठवा. म्हणजे आमच्या टीमचा सदस्य तुमची मदत करू शकेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;