या खास व्यक्तीसोबत ‘तारक मेहता..’च्या ‘बबिता’ची लंच डेट
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतीच ती तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत लंच डेटवर गेली होती. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
मार्च महिन्यात मुनमुन दत्ताच्या खासगी आयुष्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकतला ती डेट करत असल्याची ही चर्चा होती. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडा केल्याचं म्हटलं जात होतं.
या चर्चांवर मुनमुनने प्रतिक्रिया दिली होती. "हे खूपच हास्यास्पद आहे. या सर्व चर्चांमध्ये कणभरही तथ्य नाही. अशा खोट्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यात मी माझी ऊर्जा घालवणार नाही", असं तिने म्हटलं होतं. तर राजनेही या चर्चा फेटाळल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List