देशातील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटी कोण? तब्बल इतक्या हजार कोटींची संपत्तीचा मालक
शाहरुख खान (जवळपास 6300 कोटी रुपये)- शाहरुखच्या जवान आणि पठाण या चित्रपटांनी जगभरात 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. किंग खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. एका चित्रपटासाठी ते 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.
सलमान खान (जवळपास 2900 कोटी रुपये)- शाहरुख पाठोपाठ अभिनेता सलमान खान हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटाने जगभरात 466.63 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सलमान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो.
अक्षय कुमार (जवळपास 2500 कोटी रुपये)- या यादीत बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार तिसऱ्या स्थानी आहे. एका चित्रपटासाठी तो 60 ते 145 कोटी रुपये मानधन घेतो. एका वर्षात अक्षयचे चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List