प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पहिल्या एनिव्हर्सरीचे फोटो लीक, पत्नीसाठी केलेली खास व्यवस्था
झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आणि रॉयल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. आता भारताचा स्टार क्रिकेटपटू के.एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या पहिल्या एनिव्हर्सरीची चर्चा रंगली आहे. राहुल आणि अथिया यांचं लग्न जानेवारी 2023 मध्ये झालं होतं. दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाला जानेवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण राहुल आणि अथिया यांनी खास अंदाजात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. आता दोघांच्या पहिल्या एनिव्हर्सरीचे फोटो सोश मीडियावर लीक झाले आहे. एनिव्हर्सरीसाठी राहुल याने पत्नीसाठी खास व्यवस्था केली होती. लीक झालेल्या फोटोमध्ये राहुल याने पत्नीसाठी केलेली खास व्यवस्था चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
शेफ हर्ष दीक्षित यांनी राहुल आणि अथिया यांच्या एनिव्हर्सरीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एनिव्हर्सरीसाठी पांढऱ्या रंगाची थीम होती. टेबल पासून डीशपर्यंत सर्वकाही पांढऱ्या रंगाचं होतं. तर संपूर्ण खोलीत मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. पत्नी अथिया हिला खास वाटावं म्हणून राहुल याने खास स्पेशल आयोजन केलं होतं.
शेफ हर्ष दीक्षित फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘या आठवणी मी गुपित ठेवू शकलो नाही…’ फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर देखील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिन जानेवारी 2023 मध्ये भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल याच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी अनेक वर्ष राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत होते. लग्नाआधी दोघांना अनेक ठिकाणि स्पॉट देखील करण्यात आलं.
अथिया हिने ‘हिरो’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हिरो’ सिनेमानंतर देखील अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण प्रेक्षकांनी अभिनेत्रीला आणि तिच्या सिनेमांना प्रेम दिलं नाही. अथिया हिचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List