लग्नाच्या अगोदर 3 वेळा ब्रेकअप, ट्विंकल खन्नासोबत केले शेवटी लग्न, अक्षय कुमार म्हणाला, राग..

लग्नाच्या अगोदर 3 वेळा ब्रेकअप, ट्विंकल खन्नासोबत केले शेवटी लग्न, अक्षय कुमार म्हणाला, राग..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. अक्षय कुमारची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावरही सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो व्हिडीओ शेअर करतानाही कायमच दिसतो. हेच नाही तर आगामी चित्रपटाचे प्रमोशनही अक्षय कुमार सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो.

अक्षय कुमार नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करताना दिसतो. आता नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केलाय. अक्षय कुमार म्हणाला की, मी माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा ब्रेकअपचा त्रास सहन केलाय. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे ब्रेकअप होते, त्यावेळी त्याच्या मनात प्रचंड असा राग असतो.

माझे ज्यावेळी ब्रेकअप झाले, त्यावेळी मी सर्व राग व्यायामाच्या माध्यमातून काढत असतं. ब्रेकअप झाले की, मी जास्तीत जास्त व्यायाम करण्यावर भर देत असत. अक्षय कुमार याचे लग्न 2001 मध्ये ट्विंकल खन्ना हिच्यासोबत झाले. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहेत.

ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अक्षय कुमार याने शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि पूजा बत्राला डेट केले. मात्र, यांचे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही. शेवटी ट्विंकल खन्ना हिच्यासोबत अक्षय कुमार याने लग्न केले. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्या लग्नाला आता 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार आनंदात आयुष्य जगत आहेत.

अक्षय कुमार याच्यावर शिल्पा शेट्टी हिने अत्यंत गंभीर आरोप केले होते. अक्षय कुमार आपल्याला रिलेशनमध्ये असताना धोका देत असल्याचेही शिल्पा शेट्टी हिने म्हटले होते. शिल्पा शेट्टी हिच्यासोबत रिलेशनमध्ये असताना तो इतर मुलीला डेट करत असल्याचा आरोप त्यावेळी शिल्पा शेट्टी हिने केला होता. त्यानंतर शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;