मक्केत उष्णतेची लाट; पारा 52 अंशांवर, हजसाठी गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू

मक्केत उष्णतेची लाट; पारा 52 अंशांवर, हजसाठी गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या सौदी अरबमधील मक्का-मदिना येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. यंदाही लाखोंच्या संख्येने हजयात्रेकरू येथे जमले आहेत. मात्र सौदी अरबमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत असून पारा 52 अंशावर पोहोचला आहे. वाढत्या तापमानाचा हज यात्रेवरही परिणाम दिसून येत आहे. हज यात्रेसाठी आलेल्या भाविकांपैकी तब्बल 550 यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू झाला असून 2 हजारांहून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मक्केजवळील अल-मुआइसम रुग्णालयाच्या शवागारातून ही आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, उष्माघाताने मृत्यमुखी पडलेल्यांपैकी सर्वाधिक लोकं इजिप्तचे आहेत. 550 पैकी जवळपास 332 भाविक हे इजिप्तचे नागरीक आहेत. या सर्वांचा उष्णाघाताने मृत्यू झाला असून एक जण गर्दीत चेंगराचेंगरीमुळे दगावला, अशी माहिती सौदीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हज यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांपैकी आतापर्यंत 577 जणांचा उष्णाघाताने मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मयत इजिप्त असून त्याखालोखाल जॉर्डनचे 60 आणि अम्मान 41 या देशांचा नंबर लागला आहे. याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच देशांनी उष्माघाताने मृत्यू झालेल्या नागरिकांची आकडेवारी दिली आहे.

पारा 52 अंशांवर

सौदी अरबमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलाचा परिणाम मक्का-मदिनेतील वातावरणावरही होत आहे. हज यात्रेवरही याचा परिणाम होत आहे. येथीत सरासरी तापमान 0.4 अशांनी वाढत असून 17 जून रोजी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात 51.8 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे या भागात पाण्याचे फवारेही लावण्यात आले असून यात्रेकरुंनी छत्रीचा वापर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गतवर्षी पेक्षा तिप्पट आकडा

दरम्यान, गेल्या वर्षी मक्का-मदिना येथे गेलेल्या 240 यात्रेकरूंचा उष्णाघातासह विविध कारणांनी मृत्यू झाला होता. यातील बहुतांश नागरिक इंडोनेशियाचे होते. यंदाही येथील तापमान वाढल्याने गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे यात्रेकरूंच्या सेवेेसाठी स्वयंसेवक पाण्याच्या बाटल्या घेऊन उभे आहेत. तसेच यात्रेकरांनी थंडगार पेय आणि आईस्क्रीमही दिले जात आहे. यासह उन्हात फिरणे टाळा असा सल्लाही दिला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;