Sonakshi Sinha Marriage : ‘फक्त आई-बापापासून दूर नको…’, शत्रुघ्न सिन्हा भावूक
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 23 जून रोजी बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर यांचं कोर्ट मॅरेज होणार. मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी हिच्या लग्नासाठी वडील शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबात नाराजी असल्याचा दावा केला जात आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबिय लग्नात उपस्थित राहाणार की नाही… याबद्दल देखील काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा यांची देखील चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘द बिग पिक्चर’ शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा लेक सोनाक्षी हिच्यासोबत पोहोचले होते. तेव्हा दोघांमधील भावूक क्षणाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शोमध्ये रणवीर याने शत्रुघ्न सिन्हा यांना असे प्रश्न विचारले, ज्यामुळे शत्रुघ्न सिन्हा भावूक झाले.
‘मुलीला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या?’ यावर उत्तर देत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मी अनेक वर्षांनंतर ‘दबंग’ सिनेमा पाहाण्यासाठी चित्रपटगृहात गेलो. जेव्हा सोनाक्षीला मोठ्या पडद्यावर पाहिलं तेव्हा म्हणालो, स्टारचा जन्म झाला आहे…’
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मिळालेलं स्टारडम आणि ग्लॅमरने सोनाक्षीला आई – वडिलांपासून दूर नाही केलं पाहिजे..’ वडिलांच्या वक्तव्यानंतर सोनाक्षी भावूक झाली. तिने वडिलांना मिठी मारली आणि म्हणाली, ‘असं कधीच होणार नाही…’ तो भावूक करणारा क्षण आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
सोनाक्षी सिन्हा हिच्या बॉलिवूड करियरबद्दल सांगायचं झालं तर, सोनाक्षी हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता हैं…’ या एक डायलॉगमुळे सोनाक्षी प्रसिद्धी झोतात आली.
पहिल्या सिनेमातच सोनाक्षी यशाच्या शिखरावर चढली. सोनाक्षी हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. ‘हीरामंडी’ वेब सीरिज ही सोनाक्षीची पहिली सीरिज आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सीरिजने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.
सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल
सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. एवढंच नाहीतर, दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर लीक झाली आहे. सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल गेल्या 7 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 23 जून रोजी दोघं लग्न करणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List